Death Valley : जगातील ‘हा’ रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा; माणूस काय प्राणीही इथे फिरकत नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Death Valley) संपूर्ण जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी आश्चर्यकारक आहेत. ज्यांच्याविषयी जाणून कुणाही सामान्य माणसाला कुतूहल वाटू शकते. यातील काही ठिकाण तर भयानक वास्तववादी आहेत. ज्यांचे सत्य इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अद्भुत आणि विशेष आहे. अशाच एका ठिकाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणचे नाव आहे ‘डेथ व्हॅली’. जगभरातील अत्यंत भयानक ठिकाण म्हणून ‘डेथ व्हॅली’ची ओळख आहे. चला तर जाणून घेऊया या अद्भुत आणि धडकी भरवणाऱ्या ठिकाणाविषयी सविस्तर माहिती.

डेथ व्हॅली (Death Valley)

जगभरातील अत्यंत आव्हानात्मक आणि रहस्यमयी ठिकाणांमध्ये ‘डेथ व्हॅली’चा समावेश आहे. अमेरिकेतल्या नेवाडा राज्याच्या नैर्ऋत्येला कॅलिफोर्नियात हे ठिकाण आहे. हा एक रस्ता असून तो २२५ किलोमीटर आहे. हा रस्ता आज मृत्यूचा सापळा बनला आहे आणि त्यामागे काय कारण आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

अंतराळातूनही दिसतो ‘हा’ रस्ता

कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली हे एक अजब रहस्य आहे. कॅलिफोर्नियाजवळील हे ठिकाण संपूर्ण जगभरातील सर्वांत उष्ण प्रदेश म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी मनुष्य वस्ती दिसत नाही. (Death Valley) मनुष्य वस्ती काय इथे साधा एखादा प्राणीदेखील फिरकत नाही. या डेथ व्हॅलीतून जाणारा रस्ता अत्यंत रहस्यमयी आहे. तब्बल २२५ किलोमीटर लांबीचा हा सरळ रस्ता इतका गूढ आहे की, याबाबत विशेष सांगायचं झालं तर या रस्त्याला एकही वळण नाही. होय. हा एक रस्ता आहे मात्र या रस्त्याला एकही वळण नाही. त्यामुळे हा रस्ता अंतराळातूनही दिसतो असे म्हणतात.

डेथ व्हॅलीतून जाणारा गूढ मार्ग

राखड्या माणसाला डेथ व्हॅलीतून प्रवास करायचा असेल तर त्याने स्वतःजवळ जीवनावश्यक वस्तूंचा साठा आधीच ठेवावा, असे सांगितले जाते. कारण, या रस्त्यावरून प्रवास करताना वेगाची मर्यादा नाही. (Death Valley) तसेच अत्यंत दुर्गम आणि निर्मनुष्य रस्ता असल्याने गाडी बिघडल्यास मदत मिळणे मुश्किल. डेथ व्हॅलीची लांबी २२५ किलोमीटर आणि रुंदी ८ ते १४ किलोमीटर आहे. आता गुढ बाब अशी की, ही रुंदी आपोआप कमी किंवा जास्त होते. ती कशी? हे सांगणे अवघड आहे.

अत्यंत उष्ण ठिकाण

डेथ व्हॅली या ठिकाणी कायम सामान्य तापमान ५० अंशांपेक्षा जास्त असते. या उष्णतेची अनेक कारणं आहेत. यातील पहिले इथे पाऊस फार कमी पडतो. शिवाय पॅसिफिक महासागरातून येणारे कोरडे वारे इथे पोहोचेपर्यंत गरम होतात. (Death Valley) तसेच हा भाग समुद्रसपाटीपासून खूप सखल असल्याने इथे उष्णता प्रचंड जाणवते.

अमेरिकन सरकारने घोषित केलेले राष्ट्रीय स्मारक

एकतर डेथ व्हॅली अत्यंत उष्ण ठिकाण आहे. दुसरं म्हणजे निर्मनुष्य आणि भयावह लांबच्या लांब रस्त्यावरील जीवघेणी शांतता. काही काळापूर्वी शास्त्रज्ञांनी या ठिकाणी संशोधन केले होते. तेव्हा त्यांना अनेक मानवी आणि प्राण्यांचे सांगाडे सापडले. यानंतर, अमेरिकन सरकारने डेथ व्हॅलीत मरण पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ १९३३ साली या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक घोषित केलं.

इथे जाण्याची हिंमत कुणीच करत नाही

डेथ व्हॅली निसर्गाचा एक अजूबा आहे. इथे निसर्गाचे विविध चमत्कार बघायला मिळतात. मात्र इथली उष्णता कवी शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी करते आणि त्यामुळे इथे लोक जाण्याची हिंमत करत नाहीत. (Death Valley) एका वृत्तानुसार, १५ जुलै १९७२ रोजी येथील तापमान ८९ अंश सेल्सिअसवर गेले होते.

फायनल डेस्टिनेशन

डेथ व्हॅली नॅशनल पार्कमधून प्रवास करायचा असेल तर तुम्हाला सुमारे ३० ते ४० डॉलर्स प्रवेश शुल्क भरावे लागते. आता या डेथ व्हॅलीतून तुम्ही प्रवास करत असाल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे ते ठिकाण निश्चित असेल तरीही तुम्ही तुमच्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहचाल याची खात्री कुणीच घेऊ शकत नाही. मधल्या मध्ये काहीही होऊ शकतं. कदाचित म्हणूनच या इतक्या सुंदर रस्त्याला ‘डेथ व्हॅली’ म्हणून ओळखलं जातं. (Death Valley)