Tuesday, June 6, 2023

1 जानेवारीपासून बदलणार डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंट पद्धत, RBI चे नवे नियम काय आहेत जाणून घ्या

नवी दिल्ली । तुम्हीही जर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर जाणून घ्या नवीन वर्षापासून ऑनलाइन कार्ड पेमेंटचे नियम बदलणार आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुरक्षितता लक्षात घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2022 पासून हा नियम लागू करणार आहे.

ऑनलाइन पेमेंट आणखी सुरक्षित करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवेद्वारे स्टोअर असलेला ग्राहक डेटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि ट्रान्सझॅक्शनसाठी एनक्रिप्टेड टोकन वापरण्यास सांगितले आहे.

नवीन नियम काय आहेत ?
नवीन नियमानुसार, व्यापारी त्यांच्या वेबसाइटवर कार्डची माहिती साठवू शकणार नाहीत. RBI ने देशातील सर्व कंपन्यांना डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सेव्ह केलेली माहिती 1 जानेवारी 2022 पर्यंत काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. कार्डच्या सुरक्षिततेसाठी रिझर्व्ह बँकेने हा नियम केला आहे.

बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मेसेजेस पाठवले
काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना नवीन नियमांबाबत सतर्क करण्यास सुरुवात केली आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना “कार्डच्या सुरक्षिततेसाठी RBI च्या नवीन आदेशानुसार 1 जानेवारी 2022 पासून व्यापारी वेबसाइट/अ‍ॅपवर स्टोअर असलेले तुमचे HDFC बँक कार्ड डिटेल्स हटवण्यास सांगितले आहे.” आता प्रत्येक वेळी पेमेंटसाठी, ग्राहकाला एकतर संपूर्ण कार्ड डिटेल्स एंटर करावे लागेल किंवा टोकनायझेशन सिस्टीमचे पालन करावे लागेल.

टोकनायझेशन म्हणजे काय?
आत्तापर्यंत आम्हाला ट्रान्सझॅक्शनच्या वेळी 16 अंकी कार्ड क्रमांक, कार्ड एक्सपायरी डेट, CVV आणि OTP टाकावा लागतो. ट्रान्सझॅक्शन पिन देणे आवश्यक आहे. आता ही सर्व माहिती द्यावी लागणार नाही. आता कार्डच्या डिटेल्ससाठी कार्ड नेटवर्कवरून एक कोड मिळेल, ज्याला टोकन म्हटले जाईल. हे टोकन प्रत्येक कार्डसाठी खास असेल. या टोकनद्वारे कोणतीही माहिती दिली जाणार नाही.