पुण्याहून सुटणाऱ्या ‘या’ 2 ट्रेन दरम्यान “अँटी-क्रॅश बॅरियर्स” बसवण्याचा निर्णय

PUNE RAILWAY
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे ते मुंबई दरम्यान रेल्वेचा महत्वाचा मार्ग आहे तसेच पुणे ते दौंड देखील अधिक  ट्रॅफिक असलेला रेल्वेमार्ग असल्यामुळे या मार्गावर रेल्वेची ट्रॅफिक नियंत्रित करून रेलगाड्यांची गती वाढवणे गरजेचे आहे व गती वाढवताना निर्माण होणाऱ्या अपघाताच्या शक्यता कमी  करणे  महत्वाचे बनते. त्याच करणाने मध्य रेल्वे विभागाने पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौड दरम्यान ” अँटी-क्रॅश बॅरियर्स ” बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

अँटी-क्रॅश बॅरियर्स बसवण्याचे एकूण बजेट सुमारे 100 कोटी:

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गाची एकूण लांबी ६४ किमी आहे, तर पुणे ते दौंड रेल्वे मार्गाचे अंतर ७३ किमी आहे. जलद  गतीने धावणाऱ्या गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे विभागाकडून मार्गाच्या दोन्ही बाजूंना अपघातविरोधी अडथळे बसवले जातील. या अँटी-क्रॅश बॅरियर्स बसवण्याचे एकूण बजेट सुमारे 100 कोटी रुपये इतकं आहे. याबाबत माहिती देताना पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक  इंदू राणी दुबे यांनी सांगितलं कि, “आम्ही हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. आम्हाला मंजुरी मिळाल्यावर, प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी निर्णय :

पुणे रेल्वे विभागातील पुणे- लोणावळा रेल्वे ट्रॅकवर (कि. 172/6-7) आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात असामाजिक तत्वांनी रेल्वे ट्रॅकवर दगड टाकल्याचे आढळून आल्यानंतर “लोणावळा-पुणे डाऊन लोकल” (क्र. ०१५६१) वेळेवर अडवल्याने मोठा अपघात टळला. ही घटना  6 ऑक्टोबर रोजी घडली यातूनच धडा घेत रेल्वेने  अँटी-क्रॅश बॅरियर्स बसवण्याचा  निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे अपघात टाळण्यासाठी मदत होऊन रेल्वेसेवा सुरळीत चालू शकेल.