7 कोटी व्यापाऱ्यांची घोषणा: आता मास्कशिवाय दुकानांमध्ये एंट्री तसेच वस्तूही मिळणार नाहीत

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कठोर नियम अवलंबण्यावर भर दिला जात आहे. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू (night curfew) लागू करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता आता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ग्राहकांसाठी कठोर नियम बनवले आहेत. CAIT ने आता ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच, जर एखादा ग्राहक मास्क न घालता वस्तू खरेदी करायला गेला तर त्यांना माल मिळणार नाही. तसेच त्यांना दुकानात प्रवेश करण्याची परवानगी देखील दिली जाणार नाही. देशभरात कॅट संस्थेमध्ये 7 कोटी व्यापारी सामील आहेत.

सर्व स्टोअर्समध्ये फ्लॅक्स लावणे अनिवार्य केले
CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया म्हणाले की,”कोरोना संसर्गाची वेगवान गती लक्षात घेता व्यापाऱ्यांना दक्षतापूर्वक आणि शिस्तबद्धपणे व्यवसाय करण्यास सांगितले गेले आहे, व्यापाऱ्यांशी संपर्क साधून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे स्पष्ट केले जात आहे. बाजारपेठेत याविषयी जागरूकता आणण्यासाठी सर्व दुकानांमध्ये फ्लेक्स बसविणे बंधनकारक केले गेले आहे.

दुर्लक्ष करणे हानिकारक होऊ शकते
ते म्हणाले की,”आपले शहर सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी पहिल्यांदा आपले स्वतःचे काम सुधारित करा, कोरोना रोखण्यासाठीच्या उपायांचे आपल्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचार्‍यांकडून काटेकोरपणे पालन करून घ्या. तसेच, आपल्या ग्राहकांनी याचे पालन केल्यावरच त्यांच्याशी व्यवहार करा. हे लक्षात ठेवा की दुकानदार, कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोना पासून संरक्षित ठेण्यासाठी आपल्यालाच कठोर उपाययोजना कराव्या लागतील. एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो. जर व्यवसाय संरक्षित करायचा असेल तर, व्यापारी सुरक्षित आणि जागरूक असावा.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like