Thursday, February 2, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रथम मोदींनी विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम व संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारकऱ्यांच्या हस्ते संत तुकाराम पगडी देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी देहूच्या मुख्य मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरात फुलांनी तुकोबाचे अभंग लिहून सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे चार हजार किलो विविध फुले वापरण्यात आली होती.

- Advertisement -

प्रथम नरेंद्र मोदी दिल्लीहून विमानाने लोहगाव विमानतळावर दाखल झाले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ते हेलिकॉप्टरने देहू येथे दाखल झाले. त्यानंतर देहू येथील संत तुकाराम महाराजांचे प्रथम त्यांनी दर्शन घेतले.