बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना फासलं काळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना काळे फासण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात अज्ञातांनी हे कृत्य केले आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाला निषेध करण्यासाठी आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हा प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

बेळगाव या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी हे या ठिकाणी आले होते. यावेळी अज्ञातांनि अचानक पाठीमागून येऊन दळवी यांना काळे फासले. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मेळावा घेण्यात आला होता.

या मेळाव्यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी हे या ठिकाणी आले होते. यावेळी अज्ञातांनी दळवी यांना काळे फासले. या घटनेनंतर सीमाभागातील मराठी भाषिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी उद्या बेळगाव बंदची हाक दिली आहे.

Leave a Comment