मायणी मेडिकल कॉलेज फुकट बळकाविण्यासाठीच आ. गोरेंकडून कट-कारस्थान : दिपक देशमुख

0
196
Deepak Deshmukh Jayakumar Gore
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

मायणी मेडिकल कॉलेजचे तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. तसेच त्यांना ईडीने दि.18 मे पर्यंत कोठडी सुनावलेली आहे. अक्षर कॉलेज प्रकरणावरून दिपक देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले आहेत. काही अडचणीमुळे मायणी मेडिकल कॉलेज गोरे यांचेकडे भागीदारीत पार्टनरशिप देण्यात आली. संस्थेचे कर्ज भागवण्यासाठी अॅग्रीमेंट झाल्यानंतर सर्व कर्ज भागवणेचे नियोजन झाले होते. मात्र, 2019 पासून आज अखेर आ. गोरे यांनी संस्थेचे कर्ज न देता उलट महाविद्यालय फुकट बळकावण्यासाठी आ. गोरेंकडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांच्या विरोधात कटकारस्थाने केली जात आहेत, असा आरोप दिपक देशमुख यांनी केला आहे.

देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आ.जयकुमार गोरे यांच्याकडे संस्थेचे असलेली कर्जे भागवण्यासाठी पार्टनरशिप देण्यात आली. मात्र आज अखेर आमदार गोरे यांनी एक रुपयाही कर्ज भागविले नाही. संस्थेचे विद्यमान खजिनदार व आ. जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांनी मात्र संस्थेविरोधात ईंडीकडे तक्रार केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, संस्थेने कोणताही भ्रष्टाचार न केल्याने पळपुटी भूमिका न घेता डॉ. एम. आर. देशमुख हे चौकशीस सामोरे गेले.

तसेच तेथील चालू असलेले आयुर्वेद महाविद्यालय बंद पडावे व तेथील विध्यार्थी अन्य महाविद्ल्यात सामील करून घ्यावे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचा कडे आमदार महाशयांनी बनावट तक्रार केली. तसेच चालू असलेले महाविद्यालय सन 2021-22 साठी आलेली मान्यता सतेचा गैरवापर करून सदर महाविद्यालयाची सन 2021-22 ची मान्यता बनावट तक्रार देऊन आलेले मान्यता नामंजूर करून घेतली. वास्तविक या संस्थेच्या माध्यमातून आमदारांनी कोरोना काळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. मात्र, आ. गोरे यांच्यावर कारवाई न करता आता ज्यांनी ही संस्था निर्माण केली त्यांच्यावरच कारवाई करून काय साधले याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सन 2012-13, 2013-2014 व 2014 -2015 या तीन वर्षात प्रवेश घेऊन एमबीबीएसचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र महाराष्ट्र शासनाने अनियमित प्रवेश केल्याने 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. शासनाने सदर दंड कोर्टात भरला. त्यामुळे सदर महाविद्यालयावर महसूल विभागाने कारवाई करून येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्य महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. विद्यार्थ्यांकडून जमा केलेली प्रवेश ही संस्थेच्या विकासात्मक कामासाठी वापरल्याने संस्था आर्थिक अडचणीत आली व सदर देणे देणे अशक्य झाल्याने संस्थेने सदर महाविद्यालय आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे चालविण्यास दिले होते.

एम. आर. देशमुख यांनी शेकडो हाताना रोजगार दिला

मायणी मेडिकल कॉलेजच्या स्थापनेचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मोफत व वेळेवर उपचार मिळावा तसेच कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण मिळावे. याच उद्देशाने डॉ. एम. आर. देशमुख यांनी या कॉलेजची स्थापना केली. शेकडो हातांना रोजगार मिळवून दिला. परंतु शासनाच्या काही धोरणामुळे हे कॉलेज अडचणीत आल्यामुळे कॉलेजच्या आर्थिक अडचणी वाढल्या. खरे तर डॉ. एम आर देशमुख यांच्यासारख्या सामाजिक भान ठेवणाऱ्या लोकांना जर असा त्रास व्हायला लागला तर समाजात चांगुलपणा दाखवायला लोक पुढे येणार नाहीत, असे दीपक देशमुख यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here