हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुडावर (Deepak Hooda) त्याचीच पत्नी आणि माजी विश्वविजेती बॉक्सर स्वीटी बोराने (Sweety Boora) गंभीर आरोप केला आहे. दीपकला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे, तो समलैंगिक आहे आणि त्याने तिला “अकल्पनीय” गोष्टी करायला लावल्या आहेत असा आरोप करत स्वीटीने खळबळ उडवून दिलीय. स्वीटी बोराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती रडताना दिसतेय. दीपकचे इतर पुरुषांसोबत समलैंगिक संबंध असतानाचे विडिओ सुद्धा आपण बघितले असल्याचा दावा स्वीटी बोराने केलाय.. स्वीटीच्या या आरोपांनी क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.
इंस्टाग्रामवर लाईव्ह विडिओ शेअर करत स्वीटीने म्हंटल कि, ‘माझ्या नवऱ्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी त्याचे सर्व व्हिडीओ पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली होती जेव्हा मी त्याला मुलांसोबत पाहिलं. माझ्याकडे दीपक समलैंगिक असल्याचा व्हिडिओ पुरावा आहे आणि मी हे सर्व न्यायालयात सादर करेन. मला या सर्व गोष्टी समोर आणायच्या नव्हत्या, मला सर्व काही शांततेने सोडवायचे होते, पण तो माणूस माघार घेत नाही, त्यामुळे माझ्यासमोर आता पर्याय नाही. माझ्या पालकांना हे सर्व सांगण्याची हिंमतही माझ्यात नव्हती, पण आता मला सोशल मीडियावर हे सर्व सांगण्यास भाग पाडले जात आहे.
आपल्या विडिओ मध्ये स्वीटी बोरा पुढे म्हणाली, तिला फक्त दिपक कडून घटस्फोट हवा आहे. दीपक कडून तिला पैसे नकोत. मी त्याच्याकडे कधीही एक पैसाही मागितला नाही. “मी माझे पैसे खर्च केले असं तिने सांगितलं. २०१५ मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याच्या घरात शौचालयही नव्हते. त्यावेळी मी अनेक पदके जिंकली होती, पण तो माझ्याइतका यशस्वी नव्हता. जर मी त्याच्या संपत्तीच्या मागे लागले असते तर मी त्याच्यासोबत राहण्यास तयार झाले असते का? असा सवालही स्वीटी बोराने केला.
दरम्यान, स्वीटी आणि दीपकचे तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसातच स्विटीने दीपकवर हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. तिने सांगितले की, लग्नात एक कोटी रुपये आणि फॉर्च्युनर देऊनही दीपक तिला हुंड्यासाठी नेहमीच त्रास देत होता. दीपक हुड्डा हा भारतीय पुरुष कबड्डी संघाचा माजी कर्णधार असून स्विटी बुरा हिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंक




