उद्धव ठाकरेंसोबतच्या 16 आमदारांची आमदारकी रद्द होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यासह सोळा आमदारांच्या आमदारकीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. “ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावे लागते. आता 16 आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. बहुसंख्यांकांनी निवडलेल्या नेत्याचा व्हिप त्या 16 आमदारांना देखील बंधनकारक राहील, असे केसरकर यांनी म्हंटले.

दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपसोबत सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदारांबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्ही जेव्हा राज्यपालांकडे विधीमंडळात आमचा पक्षाची नोंदणी केली तेव्हा आम्ही आमच्या आमदारांच्या स्वाक्षरी दिल्या आहेत. त्यामुळे आता १६ आमदार कोणत्याही परिस्थितीत आपला निर्णय बदलू शकत नाही.

या दरम्यान आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. तर आजच सायंकाळी नव्या शिंदे गट व फडणवीस यांचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्यासह सोळा आमदारांच्या आमदारकीवर राजीनाम्याची टांगती तलवार राहणार आहे.

Leave a Comment