स्वयंघोषित हिंदुजननायकांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा?; दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अयोध्येचा दौरा केला जाणारा होता. मात्र, तो स्थगित करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून अयोध्या नगरीचा दौरा केला जात आहेत. यावरून आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. “नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वंयघोषित हिंदुजन नायकांनी अयोध्येत दिसु नये हिच श्रीरामांची इच्छा? असा सवाल करत सय्यद यांनी टीका केली आहे.

दीपाली सय्यद यांनी आज ट्विट करत राज ठाकरे यांच्यावर टीका केली असून त्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुकही केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “वंदनीय बाळासाहेबांची हिंदुत्वाची परंपरा आदित्य साहेब ठाकरे यांनी कायम राखली. नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वंयघोषित हिंदुजननायकांनी अयोध्येत दिसु नये हिच श्रीरामांची इच्छा?, असा सवाल सय्यद यांनी यावेळी विचारला आहे.

दरम्यान, मंत्री आदित्य ठाकरे हे नुकतेच अयोध्येत दाखल झाले. त्यांनी रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन देखील घेतले. तसेच रात्री युवा सेनेकडून शरयू नदीच्या काठी त्यांच्याकडून आरतीही केली जाणार आहे. आदित्य ठाकरेंसोबत दौऱ्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार अनिल देसाई आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा समावेश आहे.

Leave a Comment