टीम हॅलो महाराष्ट्र । दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित ‘छपाक’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या सिनेमा प्रदर्शित होताच दीपिका सिद्धिविनायक मंदिरात गजाननाच्या दर्शनाला गेली आहे. जेनयूतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दीपिका उभी राहिल्यानंतर सोशल मिडियावर दीपिकाला ट्रॉल केलं. तसेच सोशल मीडियावर काही नाराज गटाकडून छपाकवर बहिष्कार टाकण्याची मोहीम चालवली जात आहे. मात्र, याच सोशल मीडियावर एक मोठा गट दीपिकाच्या पाठीशी उभा राहत ‘छपाक’ पहायला आवर्जून जा असे सांगत एक काउंटर मोहीम चालवल आहे. या अशा परिस्थितीत दीपिकाचे सिनेमाच्या यशाकरीता सिद्धिविनायकाजवळ प्रार्थना करणं ही सहाजिक गोष्ट मनाली जात आहे. दीपिका तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणी ती सिद्धिविनायक मंदिरात जाते.
‘छपाक’ सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा ऍसीड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलझार यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आज १० जानेवारीला प्रदर्शित झाला. दीपिका पदुकोण या सिनेमात मुख्य अभिनेत्रीसोबत ती या सिनेमाची निर्माती सुद्धा आहे. छपाक हा स्री अत्याचार आणि त्या विरोधात दिलेल्या लढ्याच्या कहाणी लक्षात घेतामध्यप्रदेश आणि छत्तीसगढ सरकारने या सिनेमाला टॅक्स फ्री केलं आहे.
View this post on Instagram
#deepikapadukone for blessings on occasion of her film release #viralbhayani @viralbhayani