‘नो बॉल’ मुळे भारतीय महिला संघाचा घात; विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आजच्या सामन्यात एका नो बॉल ने भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला अन संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आजच्या या सामन्यात शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ७ धावा करायच्या होत्या. त्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी पहिल्या 4 चेंडूत 4 धावा केल्या आणि एक विकेट देखील गमावली. शेवटच्या 2 चेंडूत दक्षिण आफ्रिकेला 3 धावा करायच्या होत्या, तेव्हा मिग्नॉन डू प्रीझ लाँग ऑनवर झेलबाद झाली . भारतीय संघ आणि चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र तो नो बॉल असल्याचे समजताच भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला

क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 50 षटकात 275 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 49 षटकांत 5 बाद 268 धावा केल्या. आता सर्व काही शेवटच्या षटकावर अवलंबून होते. भारतीय कर्णधार मिताली राजने ही जबाबदारी ऑफस्पिनर दीप्ती शर्माकडे सोपवली जिने आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी केली होती.

दीप्तीने सामन्याच्या शेवटच्या षटकात चांगली सुरुवात केली. तीने पहिल्या 4 चेंडूत फक्त 4 धावा दिल्या. यादरम्यान त्रिशा चेट्टीही धावबाद झाली. मिग्नॉन डू प्रियाने सामन्यातील पाचवा चेंडू लाँग उंच शॉट मारून झेलबाद झाली मात्र त्यानंतर तिसऱ्या पंचाने डू प्रिया ज्या चेंडूवर आऊट झाली तो नो बॉल असल्याचे संकेत दिले. हा इशारा होताच भारतीय संघ आणि चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७४ धावा केल्या. स्मृती मानधना (७१) आणि शफाली वर्मा (७३) या दोघींनी दमदार ९१ धावांची सलामी दिली. या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार मिताली राजने अर्धशतक ठोकलं. तिने ६८ धावा केल्या. पाठोपाठ हरमनप्रीत कौरदेखील अर्धशतक करणारच होती, पण ४८ धावांवर ती बाद झाली. या चार फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली.