मिरजेत दुर्मिळ सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

 मिरजेत दुर्मिळ सांबरांच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी रसिक प्रविण जकाते यास मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंह गिल यांच्या पथकाने सापळा रचून पकडले असून त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे सांबाराचे शिंग जप्त करण्यात आले आहेत. या टोळीत आणखी कोण कोण आहे याचा तपास करून टोळीची पाळेमुळे खणणार असल्याचं मिरज पोलिसांनी सांगितले आहे.

 मिरजेतील जिनासाब दर्ग्याजवळ टी शर्ट व जिन्स घातलेला एक इसम दुर्मिळ असलेला वन्यप्राणी सांबर याची शिंगे घेवून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंह गिल यांच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीनुसार पथकाने जिनासाब दर्ग्याजवळ सापळा लावला होता. एक इसम तेथे आल्यावर पोलिसांनी त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वन्यप्राणी सांबर याची दोन शिंगे घेवून विक्रीसाठी आल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ २ लाख रुपये किमतीचे शिंगे आढळून आली. ती सांबाराची शिंगे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी वन्य प्राणी कायदा कलम प्रमाणे मिरज शहर पोलिसात रसिक जकात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन सांबर शिंगे कोठून आणली? आणि त्यांनी सांबराची शिकार केली आहे का याचा तपास घेतला जाणार आहे. तसेच ही शिंगे कोणाला देणार होते याची पोलिस माहिती घेत आहेत. तसेच याचे कोणी साथीदार आहेत याचा तपास आता पोलिस करीत आहेत.

Leave a Comment