भारतीय सैन्याच्या महिला डॉक्टरांनी रेल्वेत केली महिलेची ‘डिलिव्हरी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, हॅलो महाराष्ट्र | ‘थ्री इडीयटस’ चित्रपटात अभिनेता अमीर खानने केलेली महिलेची प्रसूती तुम्हाला आठवत असेल. गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्यावर कधी कुठे कशी प्रसूती होईल, काही सांगता येत नाही. असाच एक प्रसंग भारतीय रेल्वेमध्ये घडला आहे.

रेल्वेच्या ‘हावडा एक्सप्रेस’ गाडीमध्ये एका महिलेला अकाली प्रसूतीला सामोरे जावे लागले. या महिलेची प्रसूती भारतीय सैन्यातील दोन महिला डॉक्टरांनी केली आहे. कॅप्टन ललिथा आणि कॅप्टन अमनदीप या महिला डॉक्टरांनी ही अकाली प्रसूती केली. आई आणि बाळ दोघेही आता सुखरूप आहेत. महिलेची अकाली प्रसूती होत असताना सैन्यातील या महिला डॉक्टर देवासारख्या धावून आल्या. डॉक्टरांनी बाळासोबतचा फोटो सोशीलमीडियावर शेअर केला आहे.