हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली असून काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर 41 हजार 933 मतांनी विजयी झाले आहेत. देगलूरमध्ये पोटनिवडणूकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आणि भाजपचे सुभाष साबणे यांच्यात थेट लढत झाली होती. अखेर काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत दमदार विजय मिळवला.
जितेश अंतापूरकर याना तब्बल 108840 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष साबणे यांना 66907 मते मिळाली. एकूण 12 उमेदवार या निवडणुकीत उभे होते. शनिवारी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. जवळपास 64 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. वर्ष 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते