हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा समृद्ध वारसा आणि क्रिकेटप्रेमींचा मोठा पाठिंबा लक्षात घेत, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) लवकरच क्रिकेट विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे . हा निर्णय एमसीएच्या (MCA) कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला, आणि यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींना मोठी खुशखबर मिळाली आहे.
2025-26 पासून हा अभ्यासक्रम सुरु –
या अभ्यासक्रमाद्वारे, क्रिकेटमध्ये करिअर बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध अनुभव आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होणार आहे . आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हा अभ्यासक्रम सुरु होईल. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना क्रिकेटसंबंधित विविध महत्त्वाचे पैलू शिकवले जातील, ज्यात खेळपट्टी तयार करणे, प्रशिक्षक व विश्लेषकाचे काम, स्कोअरिंग, पंच , आयोजन कसे करावे इत्यादी गोष्टी समाविष्ट असणार आहेत. त्यामुळे अनके विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक –
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, “आम्ही मुंबईतील क्रिकेटच्या समृद्ध विकासासाठी वचनबद्ध आहोत. कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा युवा खेळाडूंना मोठा फायदा होईल. तसेच, क्रिकेटसंबंधित पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळेल.” ही योजना जवळपास दहा हजार मुलांना नोंदणी करण्याची संधी प्रदान करेल, आणि त्यामुळे मुंबईतील क्रिकेट क्षेत्राला आणखी समृद्ध करण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच मुलांच्या विकासाला फायदा होणार आहे.




