हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Delhi Airport । एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल एशिया-पॅसिफिक आणि मध्य पूर्वच्या २०२४ च्या १० सर्वोत्तम हब विमानतळांच्या यादीत दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश झाला आहे. या यादीत दिल्ली विमानतळाने १० वे स्थान पटकावलं आहे. दिल्ली विमानतळ हे देशातील एकमेव विमानतळ आहे ज्याने या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रथम क्रमांकावर आहे. चीन मधील शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे, तर कतार देशातील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ तिसऱ्या स्थानावर आहे.
हब विमानतळ वेगवेगळ्या मार्गांवरील उड्डाणांसाठी मध्यवर्ती कनेक्टिंग पॉइंट म्हणून काम करतात जेणेकरून मालवाहू आणि प्रवाशांचे ट्रान्सफर सोप्प होईल. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) चे सीईओ विदेह कुमार जयपुरियार यांनी या बहुमानाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हंटल कि, आम्हाला खूप अभिमान आहे की दिल्ली विमानतळाला (Delhi Airport) २०२४ च्या एअर कनेक्टिव्हिटी रँकिंगमध्ये एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलने आशिया-पॅसिफिक आणि मध्य पूर्व क्षेत्रातील टॉप १० हब विमानतळांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे.
दरम्यान, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ 153 ठिकाणी उड्डाण करता येते. यामध्ये 81 देशांतर्गत आणि 72 आंतरराष्ट्रीय शहरांचा समावेश आहे.दिल्ली विमानतळाने गेल्या काही वर्षांत 20 हून अधिक नवीन आंतरराष्ट्रीय शहरे जोडली आहेत, जसे की फ्नॉम पेन्ह, बाली देनपसार, कॅलगरी, मॉन्ट्रियल, व्हँकुव्हर, वॉशिंग्टन डलेस, शिकागो ओ’हेयर, टोकियो हानेदा.
टॉप 10 हब विमानतळांची यादी – Delhi Airport
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (DXB)
शांघाय पुडॉन्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ (PVG)
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DOH), कतार
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ (ICN), दक्षिण कोरिया
ग्वांगझू बाययुन आंतरराष्ट्रीय विमानतळ (CAN), चीन
बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळ (PEK), चीन
बँकॉक सुवर्णभूमी विमानतळ (BKK), थायलंड
सिंगापूर चांगी विमानतळ (SIN), सिंगापूर
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (KUL), मलेशिया
दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (DEL), भारत




