Delhi Assembly Election: भाजपला मोठा धक्का! आपच्या आतिशी यांचा कालकाजी मतदारसंघात विजय

0
9
Delhi Assembly Election
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Delhi Assembly Election| नुकतेच दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीमध्ये दिल्लीत भाजपच्या नेत्यांना चांगली मते मिळाली आहेत. तर, आम आदमी पक्षाची काही ठिकाणी निराशा झाली आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुख्यमंत्री आतिशी (Atishi Marlena) यांचा कालकाजी मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांचा त्यांनी पराभव केला आहे.

सलग दुसऱ्यांदा विजय (Delhi Assembly Election)

आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत आपच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आम पार्टीला या मतदारसंघात मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्लीची सूत्रे आतिशी यांच्या हाती सोपवण्यात आले होती. या काळात त्यांनी व्यवस्थितरित्या पक्षाची धुरा सांभाळली. आता निवडणुकीमध्ये विजय मिळवून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, दिल्लीच्या राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या आतिशी या शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा करत आतिशी यांनी दिल्लीतील सरकारी शाळांचे स्वरूप बदलून टाकले आहे.(Delhi Assembly Election) यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. आता त्यांनी रमेश बिधुरी यांचा पराभव करत कालकाजी मतदारसंघात विजय मिळवला आहे. बिधुरी यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.