दिल्लीच्या जनतेनं जसं भाजपाला नाकारलं तसं सीएए आणि एनआरसीलाही नाकारतील- ममता बॅनर्जी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना बॅनर्जी म्हणाल्या, “विजयासाठी अरविंद केजरीवाल यांचे मी अभिनंदन केले. दिल्लीच्या जनतेनं भाजपाला नाकारलं आहे. आता इथं केवळ विकासच काम करेल. जनता आता सीएए, एनआरसी आणि एनपीआरला देखील नाकारतील”

दिल्लीत मोठा विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे देशातील अनेक बड्या नेत्यांनी अभिनंदन केले आहे. ममता बॅनर्जी यांच्याबरोबर राजकीय रणनीतीकार आणि नुकतेच जेडीयूतून हाकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत किशोर यांनी देखील अभिनंदन केले आहे. तसेच दिल्लीत भाजपाच्या अहंकाराचा पराभव झाला असल्याची बोचरी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment