अरविंद केजरीवालांची तब्बेत बिघडली; उद्या कोरोना टेस्ट होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होते. या लक्षणांमुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये आहेत.

त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मग ती हॉस्पिटल्स सरकारी असो की खासगी.

दरम्यान, दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ६५४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत १३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७६१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या २१९ कंटेन्मेंट झोन आहेत. राजधानी दिल्लीत एक जूनपासून रोज १२०० हून अधिक करोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment