‘आप’कडून दिल्लीमधील शाळांमध्ये देशभक्तीचे धडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील विधानसभा निवडणूक अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपच्या आरोपांना अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम आपल्या कामातून उत्तर देत आहे.

अशातच ‘आम आदमी पार्टी’ने मंगळवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून शाळांमध्ये ‘देशभक्ती’ कार्यक्रम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. या कार्यक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांंमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत होईल, विद्यार्थ्यांमध्ये जवानांविषयी आणि तिरंग्याबाबत प्रेम-आदर वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपच्या कडव्या हिंदुत्ववादी प्रचाराला उत्तर देण्यासाठी ‘आप’ने सौम्य हिंदुत्वाचे प्रत्युत्तर दिले असल्याचे मानले जात आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी स्वत:ला हनुमानाचे भक्त मानले असून हनुमान चालिसाही त्यांनी म्हणून दाखवली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment