हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील मतदारांना संदेश दिला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करुन सिसोदिया म्हणाले,” लोकशाहीच्या महान पर्वावर सर्व दिल्लीकरांना हार्दिक शुभेच्छा! आज तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रामाणिक मनाने मतदान करा! असं आवाहन सिसोदिया यांनी मतदारांना केलं आहे.
दिल्लीवर पुढील पाच वर्ष कोण राज्य करणार, दिल्लीचे भविष्य काय असेल याबाबतचा निर्णय नोंदवण्यास राजधानीच्या मतदारांनी आज (शनिवार) सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 साठी मतदानास प्रारंभ झाला आहे.
दिल्लीतील सुमारे 1.47 कोटी मतदार आज आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि कॉंग्रेस (कॉंग्रेस) मधील 672 उमेदवारांचे भविष्य ठरवतील. खबरदारी म्हणून निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली-उत्तर प्रदेश आणि दिल्ली-हरियाणा लगतच्या सीमेवर वाहनांची कडक तपासणी अभियान राबविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीतील लोकांना मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.