जस्टीस मुरलीधर यांच्या निरोप समारंभात वकिलांची एकच गर्दी; दिल्ली दंगलीच्या सुनावणीवेळी झाली होती बदली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांना धारेवर धरणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात संध्याकाळच्या सुमारास सुनावणी संपल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. दरम्यान दिल्ली न्यायालयाच्या वतीने मुरलीधर यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. या समारंभात मुरलीधर यांना निरोप देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयातील वकिल जमले होते. यावेळी वकिलांनी एकच गर्दी केली होती. सभागृहात बसायला जागा नसल्याने कित्येकांनी पायऱ्यांवर उभे राहून या समारंभाला हजेरी लावली. या समारंभातील एक छायाचित्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या वकील नंदिता राव यांनी आपल्या फेसबुक वॉल वर पोस्ट केली आहे. या छायाचित्रात काळे कोट घातलेले वकील मोठ्या संख्येने जमलेले दिसत आहेत.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “न्यायमूर्ती मुरलीधर यांना आज निरोप देण्यात आला.  दंगल अधिनियम कायदा दिल्ली पोलिसांना वाचून दाखवण्यादिवशी रात्री ११ वाजता मुरलीधर यांची बदली करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याआधी कधीही कुठल्या न्यायाधीशाचा असा निरोप  समारंभ पाहिला नव्हता. घेतलेल्या शपथेप्रती प्रामाणिक राहत एक न्यायाधीश राज्यघटनेला वाचवण्यासाठी आणि अधिकाराचे रक्षण करण्यासाठी काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.”

दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली राष्ट्रपतींनी सरन्यायाधिशांशी चर्चा करुन पंजाब आणि हरिणाया उच्च न्यायलयात केल्याचे बदलीच्या आदेशात म्हटलं होत. न्या. एस. मुरलीधर यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असंही यामध्ये म्हटलं होत. दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. ही सुनावणी संध्याकाळच्या सुमारास संपली त्यानंतर रात्री साडे अकरा पावणेबाराच्या सुमारास मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश आले होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. 

Leave a Comment