दिल्लीत जंतरमंतरवर सुरु असलेल्या ‘सारथी बचाव’ आंदोलनास सकल मराठा समाजाचा पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

सारथी संस्था वाचवण्यासाठी करण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजातील यूपीएससी प्रशिक्षणार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाला बसली आहेत. त्याचे मनोबल वाढावे व सारथी संस्थेचीे स्वायत्तता अबाधित राहावी यासाठी या आंदोलनात सकल मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला. कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळ परिसरात हे सर्व कार्यकर्ते हातात पाठिंब्याचे फलक घेऊन बसले होते

हातामध्ये अभ्यासाचे पुस्तक वह्या घेऊन थकलेल्या विद्यावेतन यासह अन्य  मागण्यांसाठी हे विद्यार्थी आंदोलनला बसले आहेत. गेले तीन महिने विद्या वेतन थकले आहे. खोली भाडे थकले असून विद्यार्थ्यांचे जेवणाचे देखील हाल होत आहेत. त्याचबरोबर संशोधन करण्यासाठीही विद्यार्थ्याला पैसा नाही, अडीअडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी नैराश्य अवस्थेत आहेत. सारथी संदर्भात चुकीच्या बातम्या पाहून विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.त्यांची बेचैनी वाढली आहे.दिल्ली येथे यूपीएससीचे 225 विद्यार्थी आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात संशोधन  करणारे 500 संशोधक विद्यार्थी आहेत.त्याचबरोबर तीन हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण अधांतरी झाले आहे.स्पर्धा परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यात आर्थिक दुर्बलता मराठा समाजातील विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडवत आहे त्यामुळे राज्य शासनाने लक्ष वेधण्यासाठी पुस्तक घेऊन अभ्यास करीत विद्यार्थी निदर्शने करीत आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जवळपास 25 पेक्षा अधिक कार्यकर्ते शाहू स्मारक समाधीस्थळ या परिसरात सारथी संदर्भात फलक हातात घेऊन बसले होते

यावेळी सकल मराठा समन्वयक वसंतराव ( नाना)मुळे ,इतिहास संशोधक इंद्रजित सावंत ,दिलीप देसाई, संजय काका जाधव, शाहीर दिलीप सावंत ,संदीप देसाई, संजय काटकर, विकास जाधव, अवधूत पाटील व शिवाजी विद्यापीठातील सारथी संशोधक विद्यार्थी प्रवीण शेंबडे, विक्रम मोरे अरविंद पाटील, शिवजीत बोधले, सायली यादव सोनाली पाटील आदी विद्यार्थी उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment