मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी जोडप्याला हटकले, त्यानंतर ती महिला डायरेक्ट किसवरच आली ! (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे या कोरोनावर आवर घालण्यासाठी देशात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळला तर त्याच्यावर पोलीस आणि प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी पोलिसांच्या या कारवाईला विरोध होताना दिसत आहे. अशीच एक घटना दिल्लीच्या दर्यागंजमध्ये घडली आहे. यामध्ये एका महिलेला मास्क न घातल्याबद्दल विचारले असता ती थेट किसवर आली आहे. “हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तर मी त्याला किससुद्धा करेल,” असे उत्तर या महिलेने दिले आहे. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

काय आहे नेमका प्रकार ?
दिल्लीमध्ये कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये अनेक कोरोना प्रतिबंध लावण्यात आले आहेत. पोलीस ठिकठिकाणी कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत. या तपासणीदरम्यान दर्यांगज येथे एका जोडप्याला पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे विचारणा केली. तेव्हा ती महिला उलट पोलिसांवरच भडकली. तिने पोलिसांशी अरेरावी करत शिवीगाळ सुद्धा केली. तसेच त्या महिलेने मास्क घालणार नाही. काय करणार असा उलट सवालदेखील केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महिला थेट किसवर आली
पोलिसांनी जेव्हा या महिलेला मास्क न घालण्याचे कारण विचारले. त्यावर उत्तर म्हणून या महिलेने कोरोना वगैरे काही नाही. कोरोनाच्या नावाखाली आम्हाला परेशान केले जात आहे. मी मास्क लावणार नाही; काय करणार ? असे म्हणत पोलिसांना थेट आव्हानदेखील दिले आहे. तसेच तिने आपल्या पतीकडे बोट करत हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तरी मी त्याला आता इथेच किस करेल, असंसुद्धा ही महिली म्हणाली. तिच्या या वागण्याचा व्हिडिओ काही क्षणातच वायरल झाला. या घटनेदरम्यान पोलिसांसोबत महिला पोलीस नसल्यामुळे दर्यागंजच्या रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

You might also like