३१ जुलै पर्यंत बंद राहणार दिल्लीतील शाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना संक्रमणामुळे सध्या बहुतांश ठिकाणी संचारबंदी आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर दिल्लीतील रुग्णसंख्या वाढते आहे असे दिसून येते आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका होऊ नये यासाठी दिल्ली सरकारने ३१ जुलै पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी आज (शुक्रवारी) ही घोषणा केली आहे.  

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशभरात महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. आता दिल्ली सरकारने देखील कोरोना संक्रमणाच्या अटकावासाठी काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये दिल्लीतील शाळा ३१ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील प्राथमिक शाळा ३१ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना संक्रमणाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतेच आहे. 

https://twitter.com/ANI/status/1276509776566874114  

मुंबई पाठोपाठ आता दिल्लीत रुग्णसंख्या वाढते आहे. ७३ हजारच्या वर रुग्ण संख्या दिल्लीत आढळून आली आहे. दिल्लीतील कोरोना संक्रमणाच्या अटकावासाठी दिल्ली सरकारने अगदी सुरुवातीला बायोमेट्रिक बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ९७ लाखापर्यंत मजल मारली आहे. ज्यामध्ये साधारण ५ लाख रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

Leave a Comment