अजित डोवाल यांनी केला हिंसाग्रस्त भागाचा दौरा; स्थानिकांना दिला धीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाग्रस्त मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यापूर्वी त्यांनी सीलमपूर डीसीपी कार्यालयात उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर अजित डोवाल यांनी तेथील स्थानिक नागरिकांची भेट घेतली. उत्तर-पूर्व दिल्लीचा भाग असणाऱ्या मौजपूरमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला आहे. अजित डोवाल यांनी स्वत: तिथे जाऊन सर्वसामान्यंशी संवाद साधला. त्यांना विश्वास दिला. ‘मनात प्रेमाची भावना ठेवा, आपला एक देश आहे’ असे नागरीकांशी संवाद साधताना ते म्हणाले.

उत्तर-पूर्व दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर आणि चांदबागेत सुरू असलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तर, या हिंसाचारात सुमारे २०० लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पोलिस दलातील जवानाचाही समावेश आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment