नवी दिल्ली । दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्बेत खालावली असून मंगळवारी त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळं सत्येंद्र जैन यांची कोरोनाची टेस्टही झाली आहे. त्यांच्या टेस्टचा अहवाल लवकरच येईल.
Due to high grade fever and a sudden drop of my oxygen levels last night I have been admitted to RGSSH. Will keep everyone updated
— Satyendar Jain (@SatyendarJain) June 16, 2020
खुद्द सत्येंद्र जैन यांनी ही माहिती ट्विटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ”तीव्र ताप आणि श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तुम्हाला माहिती देत राहिल.” यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ट्विट करुन सत्येंद्र जैन लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. त्यांनी म्हटलं की,’ आपल्या आरोग्याची काळजी न घेता, २४ तास सेवेत व्यस्त आहात. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.”
विशेष म्हणजे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकामध्ये ही सहभागी होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत ही सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांना ताप आणि खोकला याची समस्या होती. पण त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली. अरविंद केजरीवाल यांनी २ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केले.
अपनी सेहत का ख़्याल किए बिना आप रात दिन 24 घंटे जनता की सेवा में लगे रहे। अपना ख़्याल रखें और जल्द स्वस्थ हों। https://t.co/pmsU5fuuRP
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”