पुढचे दोन आठवडे पेट्रोल -डिझेल मध्ये दर वाढ सुरूच राहणार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. तेल कंपन्यांकडून सोमवारी सलग नवव्या दिवशी दरांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी दिल्लीतील पेट्रोलचे ७५.७८ रु प्रति लिटर दर आज ७६. २६ झाले आहेत. तर रविवारी ७४.०३ रु भाव असणाऱ्या डिझेलचे भाव ७४.६२ रु प्रति लिटर झाले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात या दरांमध्ये घट होण्याची काहीच शक्यता नाही कारण पुढचे दोन आठवडे हे दर सातत्याने वाढत राहणार आहेत.

पेट्रोलच्या दरात ८ रुपयांपर्यंत वाढ करून संचारबंदीच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्याचे तेल कंपन्यांचे नियोजन आहे. त्यामुळे किमान पुढचे २ आठवडे दर हे वाढतच राहणार आहेत. १६ मार्च पासून साधारण ८३ दिवस संचारबंदीच्या काळात पेट्रोल दरात काहीच वाढ झालेली नाही. संचारबंदीच्या काळात झालेली वाढ ही राज्य सरकारने कर रूपात केली होती. तर सरकारने देखील उत्पादन शुल्कात ३ रुची वाढ केली होती. गेल्या ९ दिवसापासून पेट्रोल दरात ५ रु तर डिझेल च्या दरात ५.२३ रु वाढ झाली आहे.

पुढच्या आठवड्यात या वाढीसोबत कदाचित ६० पैसे प्रति लिटर दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. तेल मंत्रालयाच्या अनुसार मे महिन्यात १.४६५ कोटी टन तेल खपले आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत ते ४७.४ आहे. सरकारने उत्पादन शुल्कात ३ रु वाढ केली असली तरी या कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे कर लावले नाहीत. संचारबंदीनंतर आता डिझेल ची मागणी होते आहे. त्यामुळे आता संचारबंदीच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ कंपन्या करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment