औरंगाबाद : शहरात डेल्टा प्लसचा एकही रूग्ण नाही. तरी सुद्धा शासनाने नवीन नियमावली लागू करत बाजारपेठेच्या वेळा कमी केल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे व्यापारी व व्यापाऱ्यांवर अवलंबून असणारे कामगार व त्यांचे कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडूनही व्यापाऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज मिळत नाही.
यासंदर्भात व्यापारी महासंघाच्या कार्यकर्ते व सदस्य यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली.
टोपे यांच्या सोबत चर्चा करून व्यापाऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. तसेच शहरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आटोक्यात असून शहरातील बाजारपेठेवर वेळेबाबत घातलेले निर्बंध शिथिल करून सकाळी सात ते रात्री सात पर्यंतची वेळ निश्चित करण्यात यावी.
सोमवार ते रविवार पर्यंत बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात यावी औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी असून शनिवार-रविवार बाजारपेठ बंद असल्यास चुकीचा संदेश जात आहे. अशा प्रकारच्या मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी तुपे यांच्याशी चर्चा करून मुंबईला गेल्यानंतर व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सुचक वक्तव्य याप्रसंगी केले व व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही केला.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे ,सचिव लक्ष्मी नारायण राठी, अजय शहा, प्रफुल मालानी, तनसुख झांबड, जयंत देवळानकर, सरदार हरी सिंग, गुलाम हक्कानी, संतोष कावळे, स्वामी व इतर व्यापारी हजर होते.