Monday, January 30, 2023

मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र- मागच्या 3 आठवड्यांपासून राज्यात पावसाने मोठा खोळंबा केला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते माध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने गेल्या २४ तासांतील सरासरी पावसाची नोंद वर्तवली आहे. यामध्ये मुंबई शहर: ०.५८ मिमी, पूर्व उपनगरे २.०३ मिमी, पश्चिम उपनगरे: १.३१ मिमी अशी नोंद वर्तवण्यात आली आहे.जुलै सुरू झाल्यापासून मुंबईचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जवळपास तीन अंशांनी अधिक नोंद होत आहे. किमान तापमानातही साधारण दोन अंशांची वाढ होत आहे. पारा 33 अंशांच्या पुढील कमाल पातळीवर झेपावत आहे. याचदरम्यान हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही 80 टक्क्यांच्या पुढे राहत असल्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची प्रचंड लाहीलाही होत आहे.

मुंबईमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. या आठवड्याच्या शेवटी चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. यामुळे लवकरच पावसाला सुरुवात होईल. या आठवड्याच्या शेवटपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भरती
०९:२५ वाजता ३.५१ मी
२०:३७ वाजता ३.२४ मी

ओहोटी
१५:०० वाजता ०२.३५ मी