कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री व कराडचे सुपुत्र असलेले स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्म शताब्दी नुकतीच झाली आहे. स्व. चव्हाण साहेब यांच्या जन्म शताब्दी निमित्त शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. त्यामुळे शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटच्या 4 नं. गेटला ऊभी करण्यात आलेल्या कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) प्रवेशद्वार असे नाव देण्याची मागणी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे यशवंत प्रेमींनी केली आहे.
कराड तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडित असणारी बाजारपेठेचे ठिकाण म्हणजे बाजार समिती हे आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांचे कराड शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. देश, राज्य यासोबत आपल्या कराडचा चाैफेर विकास केलेल्या या सुपुत्राचा गाैरव व्हावा म्हणून त्यांचे नांव बाजार समितीच्या गुळ मार्केट येथे उभारलेल्या कमानीस देण्यात यावे.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीनिमित्त शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. स्व. चव्हाण साहेबांनी सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजवलेली आहेत. तरी सर्व शेतकरी बांधव, संघटना व तमाम कराड तालुक्यातील जनतेच्यावतीने या कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार हे नाव द्यावे अशी मागणी यशवंतप्रेमींनी केली आहे.