सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गेली अनेक वर्षे आधी समाजकारण मग राजकारण असं धोरण अंगीकारून सामाजिक कार्य करत असणाऱ्या माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वर दाखल झालेल्या गुन्ह्याची फेर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडूज नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा शोभा माळी
व महिला नगरसेविकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी खटाव तालुक्यातील पडळ येथील के. एम. शुगर या साखर कारखान्यात एका अधिकाऱ्याला गंभीर स्वरूपात मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी आमदार प्रभाकर घार्गे सह सुमारे 18 ते 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार प्रभाकर घार्गे हे
अतिशय समंजस व सामाजिक कार्य करणारे व्यक्तीमत्व असून त्यांच्यावरील गुन्ह्याची फेर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यावेळी नगरसेविका शोभा माळी,सुनीता कुंभार, सुवर्णा चव्हाण, काजल वाघमारे, नीता गोडसे, नगराध्यक्ष सुनिल गोडसे,संदीप गोडसे,सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, राजू कुंभार,अमोल वाघमारे आदींची उपस्थिती होती.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा