खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याची जलसंपदा विभागाला निवेदनातून मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील खेर्डा प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. दिनेश पाटेकर यांनी नुकतीच निवेदनाद्वारे गोदावरी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पुढे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बालानगरसह परीसरात जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात पडलेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी कशीबशी खरीप पेरणी केली.

त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे आता कोवळी पिके माना टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई भासत आहे. अशा परीस्थितीत पाण्याची खुप गरज आहे. येथून जवळच असलेल्या खेर्डा प्रकल्पातही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पावर परीसरातील सुमारे ३० गावे अवलंबून आहेत.

दरम्यान, अशा परीस्थितीत जर या प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडले तर प्रकल्पातील जलजीवन (जलचर प्राणी) व या भागातील बुहतांश शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच परीसरातील गावाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मदत होईल. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.

Leave a Comment