Saturday, March 25, 2023

शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाकरीता 5 कोटी रूपयांची मागणी : आ. शशिकांत शिंदे

- Advertisement -

जावली | तब्बल 9 वर्षाहुन अधिक काळ महसुल विभागाकडून देवस्थान इनाम वर्ग 3 जागेमुळे रेंगाळत पडलेला हुतात्मा तुकाराम ओंबळे याच्या स्मारकांचा प्रश्न अखेर जमिनीवरील शेरा कमी करुन जमीन कर भरण्याबाबत जावलीच्या केडांबे गावाचे सुपुत्र अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाकरीता 1 हेक्टर जागा महसुल व वन विभागाकडुन जिल्हाधिकारी सातारा याच्याकडे विषेश बाब म्हणुन हस्तांतरीत करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडी सरकार कडून घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. लवकरच शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारकाकरीता 5 कोटी रुपायाची तरतूद करावी अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मत्री हसन मुश्रीफ याच्याकडे केली असल्याची माहीती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 16 जानेवारी 2012 रोजी मंत्रालयात हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारक उभारणीबाबत बैठक घेण्यात आली. हुतात्मा ओंबळे यांचे जन्मगाव केडांबे येथे गावाजवळील एक हेक्टर जागेचे क्लिअर टायटल करुन जमीन जिल्हाधिकारी सातारा यांच्या नावे करण्याची कार्यवाही सातारा जिल्हाधिकाऱ्यांना एक महिन्यात करुन घेण्याचा आदेश सामान्य प्रशासनाच्या उपसचिवांनी दिले होते.

- Advertisement -

केडांबेमधील गट नंबर 159 क्षेत्र 2 हेक्टर 62.1 आर या भूखंडावर हुतात्मा ओंबळे स्मारक उभारण्याची निश्चिती जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतकडून निश्चित करण्यात आले. केडांबे ग्रामपंचायतीने अट शिथील व मालकीहक्काबाबत सातबारावरील सहहिस्सेदार रघुनाथ ओंबळे, रामचंद्र पाडळे, लक्ष्मण ओंबळे, पांडुरंग ओंबळे, बाबुराव ओंबळे, हौसाबाई शेलार, सुभद्रा शेलार या सर्व शेतकऱ्यांनी विनामोबदला एक हेक्टर जागा स्मारकाकरीता देणारे समंतीपत्र 2013 मध्येच देऊन सहकार्य केले.