दलित महासंघाची मागणी : चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करावी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

लोकसाहित्यिक आण्णाभाऊ साठे कृती समिती दलित महासंघाच्यावतीने 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवदेनाद्वारे मागणी करण्यात आली.

निवेदनाद्वारे म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फोडजाई देवीच्या पटांगणातून दि. 21 मार्च रोजी पहाटे 5.00 वाजता अल्पवयीन चार वर्षाच्या बालिकेला अनोळखी इसमाने टू व्हीलर गाडीवरती उघालून नेवून तिच्यावरती अमानूष अत्याचार केला. तेव्हा त्या नराधमास तात्काळ अटक करण्यात यावी.

पीडीत मुलगी ही पारधी कुटुंबातील असून शासनाने पीडीत मुलीच्या कुटुंबीयाला समाजकल्याण अंतर्गत तात्काळ मदत करण्यात यावी. घडलेली घटना निदंनीय असून या घटनेचा दलित महासंघ निषेध करत असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच लवकरात लवकर आरोपी न सापडल्यास दलित महासंघाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.

चोवीस तास होवून गेले तरी आरोपीचा शोध लागत नाही, ही बाब गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी असून पीडीत मुलीच्या कुटुंबाला सरकारने संरक्षण देवून तात्काळ मदत करावी. या आंदोलनाच्या वेळी उमेश चव्हाण, मिनाक्षी अनजुर्गी, अजय राठोड, प्रशांत कोळी, अनिल मोहिते, गिता जगदाळे, दत्ता पवार, मयुर शिंदे, अरुणा भोसले, नलिनी घाडगे, सुषमा ढेंबरे, नम्या भोसले, यंञ्या भोसले, अंबर शेठ भोसले, शंकर भोसले, पितांबर शिंदे, तेजस सपकळ, मंगेश चव्हाण, अोंकार निकम, उमेश चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

दळवी

Leave a Comment