हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेने चांगलाच चोप दिला आहे. जितू खाडे अस सदर व्यक्ती चे नाव असून या संपूर्ण प्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यासंपूर्ण प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओ मध्ये आयटम चाहीये?, असं म्हणत एक महिला शिवसेना विभागप्रमुख असलेल्या जितू खाडे याला चपलेनं रिक्षातच मारायला सुरुवात करते. पीडित महिलेनं जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
दरम्यान, यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी जितू खाडे याने काही काळानंतर घटनास्थळावरुन पोबारा केल्यानंतर महिला रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालकांकडून संताप व्यक्त होतो आहे.