व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराडात नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ; मूस्लिम समाज आक्रमक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजपाच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्यावर देशभरात विविध संघटनांनी संताप व्यक्त केला जात आहे. कराड येथील मूस्लिम समाज आक्रमक झाला असून आज उलमा आईमा हुफ्फाज कमेटी, जमात रजा- ए- मुस्तफा कमिटी व समाजाच्या वतीने तहसिलदार विजय पवार व वरिष्ठ पो. निरक्षक बी. आर. पाटील यांना निवेदन देऊन शर्मा व जिंदल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शहर पोलिसात फिर्याद ही दाखल करण्यात आली आहे.

कराड शहर पोलीस स्टेशन व कराड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपाच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आपल्या हलक्या विचाराची प्रचिती देत समस्त इस्लाम धर्माचे प्रेषित (ह. मोहम्मद सल्ललाहु अलैही व सल्लम) पैगंबर यांच्याविषयी अत्यंत अवमानास्पद टिपणी (भाष्य) केले व ते इंटरनेटवर सर्वत्र पसरले गेलेने अत्यंत गंभीर स्वरूपात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सदर आरोपी यांचे विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.

अशा स्वरूपाच्या टिप्पण्या तसेच लेख जाणीवपूर्वक केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट करून केल्या जात आहेत. त्यामुळे समस्त मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे. अशा स्वरूपांच्या वक्तव्याचे विरुद्ध कडक कायदे होणे आवश्यक आहे व त्या कायद्यान्वये अशा स्वरूपांच्या घटनांवर आळा घालणे गरजेचे आहे. याची सूचना आपले कार्यालयामार्फत प्रशासनास देण्यात यावी. आरोपी जिंदल व नुपुर शर्मा यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई व भारतीय दंड संहिता कलम 153 ए. 153 ब, 295 ए, 504, 505 (1) 505 (2) प्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी. तसेच याविषयी आमचे जबाब नोंदवण्यात यावे असेही या फिर्यादीत व निवेदनात जमात रजा-ए-मुस्तफा कमिटी व उलमा आईमा हुफ्फाज कमेटी कराड व मुस्लिम समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी यावेळी शाही इमाम हाफिज अब्दुल आयाज, मुफ्ती खालिद बेपारी, कमर अली मुत वल्ली, तोफिक इनामदार, हरून तांबोळी, जहीर शिकलगार, रमजान कागदी, कारी फारुख, जावेद नदाफ, मौलाना खुश मोहम्मद, मौलाना कोसर रजा, आलिज मुतवली, फारुख पटवेकर, अल्ताफ शिकलगार, मजहर कागदी, इसाक सवार, साबिर मियाँ मुल्ला, नवाज सूतार तसेच कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.