सातारा | राजकारणात विकासकामांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. एक मजबूत सरकार असणं आणि त्याला विधायक, मजबूत विरोधक असतील तरच लोकशाही टिकू शकते, असे वक्तव्य माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सातारा येथे केले.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सातारा येथे शासकीय विश्रामगृहात काहीकाळ थांबल्या होत्या. यावेळी भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, सातारा म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेले छ. शिवाजी महाराजांचा वारसा असलेले गाव आहे. सातारा जिल्ह्याचे एक विशिष्ट वैशिष्ट आहे. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री साताऱ्याने दिले. त्यानंतर मोठ- मोठे राजकीय नेते मिळाले. बाळासाहेब देसाई, किसनवीर हे मोठे स्वातंत्र्य सैनिक येथील होते. साताऱ्यात मी अनेकदा आले. महाराष्ट्राविषयी मला नैसर्गिक अोढ आहे. म्हणूनच मी दिल्ली सोडून महाराष्ट्रातच राहते.