Tuesday, January 7, 2025

Dengue Vaccine | भारत लवकरच होणार डेंग्यूमुक्त; स्वदेशी लसीची 10 हजार लोकांवर होणार चाचणी

Dengue Vaccine | पावसाळा सुरू झाला की, पावसासोबत अनेक आजार देखील येतात. पावसाळ्यात सहसा डेंगूच्या डासांची संख्या वाढते. आणि अनेक लोकांना डेंगूची (Dengue Vaccine) लागण होते. डेंगूचा ताप झाल्यावर वेळेवर उपचार घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक लोकांचा यात मृत्यू देखील होतो. सध्या डासांपासून डेंगूची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यावर आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. लोकांमध्ये जनजागृती करणे, त्याचप्रमाणे औषधाची फवारणी करणे. यांसारख्या गोष्टी आरोग्य विभाग करत आहे. अशातच आता डेंगूला रोखण्यासाठी (Dengue Vaccine) लस देखील तयार करण्यात आलेली आहे. आणि याची चाचणी सुमारे 10335 नागरिकांवर देखील करण्यात येणार आहेत.

शास्त्रज्ञांनी डेंगीऑल नावाची एक लस (Dengue Vaccine) तयार केलेली आहे. या लसीची चाचणी 18 ते 60 वर्षांच्या लोकांवर केली जाणार आहे. पॅनिसिया या बायोटेकने अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या मदतीने ही लस तयार केलेली आहे. या लसीची देशभरात 19 ठिकाणी चाचणी घेण्यात येणार आहे.

अमेरिकन संस्थेसोबत करार करून ही एक स्वदेशी लस (Dengue Vaccine) तयार करण्यात आलेली आहे. काही घटक वगळता या लसीची विषाणू रचना ही NIH प्रमाणेच आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या लसीचा निकाल चांगला आलेला आहे. डेंगूच्या चार प्रकारच्या विषाणूंवर ही स्वतः प्रभावी ठरणार आहे. या एकाच लसीमध्ये चारही विषाणूंची संरचना उपलब्ध असणार आहे. त्यातून विषाणूजन्य जनकांचे काही भाग हे काढून टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही लस घेतल्याने स्वतःहून डेंगू होणार नाही. याची काळजी देखील घेण्यात आलेली आहे. अशाप्रकारे आता आपला भारत हा डेंगूमुक्त होणार आहे. ही लस एकदा नागरिकांना देण्यात आली की, याचे चांगले परिणाम दिसायला लागणार आहेत.