नवी दिल्ली । तुमचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) किंवा सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही या आर्थिक वर्षात यापैकी कोणत्याही खात्यात पैसे जमा केले नाहीत तर लगेचच त्यामध्ये थोडे पैसे जमा करा. तुम्ही असे न केल्यास तुमचे खाते इनऍक्टिव्ह होईल आणि एकदा खाते इनऍक्टिव्ह झाल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी दंड भरावा लागेल.
तुम्ही इन्कम टॅक्ससाठी दोनपैकी एक टॅक्स सिस्टीम निवडू शकता. एक जुनी टॅक्स सिस्टीम आणि दुसरी नवीन टॅक्स सिस्टीम. नवीन इन्कम टॅक्स सिस्टीममध्ये, उत्पन्नावर जास्तीत जास्त टॅक्स सूट आणि कपात दिली जाते. जर तुम्ही नवीन इन्कम टॅक्स सिस्टीम निवडली असेल तर तुम्हाला PPF, NPS आणि SSY ची खाती ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी किमान रक्कम जमा करावी लागेल.
PPF मध्ये मिनिमम डिपॉझिटची रक्कम किती आहे ?
एका आर्थिक वर्षात PPF खात्यासाठी किमान वार्षिक योगदान रुपये 500 आहे. चालू आर्थिक वर्षासाठी हे योगदान देण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे.
मिनिमम डिपॉझिट न केल्यास काय होईल?
जर तुम्ही 31 मार्चपर्यंत किमान रक्कम जमा न केल्यास, तुम्हाला प्रत्येक वर्षी 50 रुपये दंड भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला 500 रुपयांच्या मिनिमम डिपॉझिटच्या रकमेसह प्रति वर्ष 50 रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही दोन वर्षे पैसे न भरल्यास तिसर्या वर्षी तुम्हाला दोन वर्षांसाठी 500 + 500 रुपये दंड आणि दोन वर्षांसाठी 50 + 50 रुपये दंड भरावा लागेल.
PPF खाते बंद केले जाईल
पुढे, त्याच आर्थिक वर्षात मिनिमम डिपॉझिट न दिल्यास, PPF खाते बंद केले जाईल. बंद झालेले PPF खाते हे खाते सुरु केले जाईपर्यंत कर्ज मिळविण्यासाठी किंवा आंशिक पैसे काढण्याच्या सुविधेसाठी पात्र असणार नाही. बंद खाते त्याच्या ओरिजिनल मॅच्युरिटीची तारीख संपण्यापूर्वी पुन्हा चालू केले जाऊ शकते. मात्र मॅच्युरिटीनंतर ते ऍक्टिव्ह केले जाऊ शकत नाही. तसेच मॅच्युरिटीपूर्वी ते बंदही करता येत नाही.
NPS मध्ये किमान रक्कम
Tier-I NPS खातेधारकांसाठी, सध्याच्या नियमांनुसार, खाते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आर्थिक वर्षात किमान 1,000 रुपये योगदान देणे बंधनकारक आहे.
NPS टियर-I खात्यात किमान योगदान न दिल्यास, खाते इनऍक्टिव्ह होईल. फ्रीझ असलेले NPS खाते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला किमान योगदानासह दरवर्षी 100 रुपये दंड भरावा लागेल. NPS खाते अनफ्रीझ करण्यासाठी पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) शुल्क देखील जोडले जाईल.
जर एखाद्याचे देखील टियर-II NPS खाते असेल (ज्याला निधी लॉक-इनची आवश्यकता नसते), तर Tier-I खाते गोठवण्यासोबत टियर-II खाते देखील गोठवले जाईल. मात्र, टियर II NPS खात्यामध्ये किमान योगदानाची आवश्यकता नाही.
सुकन्या समृद्धी खाते योजना
सुकन्या समृद्धी खाते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा न केल्यास ते डिफॉल्ट खाते म्हणून मानले जाईल.
SSY खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी डिफॉल्ट केलेले खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते. खाते ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक डीफॉल्ट वर्षासाठी 50 रुपयांच्या दंडासह 250 रुपये किमान योगदान द्यावे लागेल.