नवी दिल्ली । लहान बचत योजनांचे व्याजदर फार जास्त नसले तरी पैसे जमा करण्याचा हा एक सुरक्षित आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. लहान बचत योजनांवर दिले जाणारे व्याजदर सरकारी बॉण्ड यील्डशी जोडलेले असतात, जे तिमाही आधारावर सुधारित केले जातात. पोस्ट ऑफिस अशा अनेक डिपॉझिट प्लॅन ग्राहकांना ऑफर करते ज्यात सॉव्हरेन गॅरेंटीसह टॅक्स बेनेफिट देतात. यामध्ये तुमचा पैसा बुडणार नाही याची गॅरेंटी सरकार देते. याशिवाय, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या काही योजना देखील चालवते. या अशा बचत योजना आहेत, ज्यामध्ये छोटी-छोटी गुंतवणूक करूनही मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते.
इंडिया पोस्ट, PPF, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम (MIS) आणि सुकन्या समृद्धी योजना या विविध योजनांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून लोकं यापैकी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकतात. खाते उघडण्यासाठी, तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून खाते उघडण्याचा फॉर्म घ्यावा लागेल आणि तो kyc फॉर्मसह भरावा लागेल. तसेच, तुम्हाला कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची आहे हे सांगावे लागेल. लहान बचत योजनांची काही वैशिष्ट्ये येथे दिलेली आहेत:
PPF
सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक असलेली PPF मधील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर सूट देखील देते. या योजनेत तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये जमा करू शकता. यातून मिळणाऱ्या व्याजावर टॅक्सही आकारला जात नाही. तुम्ही कोणत्याही आर्थिक वर्षात किमान 500 रुपये योगदान देऊ शकता. सध्या त्यावर 7.1 टक्के वार्षिक (चक्रवाढ वार्षिक) व्याज मिळते. याचा लॉक-इन पिरियड 15 वर्षांचा आहे. मात्र, 15 वर्षानंतर, तुम्ही ही योजना पाच वर्षांच्या ब्लॉकपर्यंत वाढवू शकता. PPF खाती बँकांमध्येही उघडता येतात.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे लहान बचत योजनांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे, जे गुंतवणूकदारांना टॅक्स बेनेफिट देखील देतात. यामध्ये किमान ठेव मर्यादा 1,000 रुपये आहे, तर कोणतीही उच्च मर्यादा नाही. योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. सध्या सरकार त्यावर 6.8 टक्के चक्रवाढ व्याज देत आहे.
नॅशनल सेव्हिंग मंथली इनकम
या योजनेत किमान रु. 1,000 डिपॉझिट केले जाऊ शकतात, तर खात्यात कमाल गुंतवणुकीची मर्यादा रु. 4.5 लाख आहे. जॉईंट अकाउंट मधील गुंतवणुकीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे. सध्या या योजनेवर 6.6 टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहे. व्याज दरमहा दिले जाते. 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही हे खाते कायमचे बंद करू शकत नाही. गुंतवणूकदाराने 1 वर्षानंतर आणि 3 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेच्या 2 टक्के इतका दंड वजा केला जातो. त्याचप्रमाणे, खाते 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी बंद केल्यास, मूळ रकमेतून 1% वजा केला जातो.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. सध्या या योजनेत 7.6 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेसाठी किमान ठेव रक्कम 250 रुपये आहे, तर वरची मर्यादा प्रत्येक आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये आहे. खाते उघडल्याच्या तारखेपासून 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. मात्र, ही योजना खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा ज्या व्यक्तीच्या नावाने खाते उघडले आहे त्याच्या लग्नाच्या वेळी मॅच्युर होईल.