औरंगाबाद : रोकडिया हनुमान कॉलनीतील प्लंबर चे काम करणाऱ्या 35 वर्षीय युवकाने बाथरूमच्या अँगलला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. अनंत तातेराव गायकवाड (वय 35,रा. रोकडिया हनुमान कॉलनी) असे मृताचे नाव आहे. त्या युवकाने साधारण दोन ते अडीच महिन्यापूर्वी ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
अनंत गायकवाड प्लंबरचे काम करत होता. त्याची आई आणि पत्नी धुणीभांडी करते. लॉकडाऊनमुळे कामही बंद होते. त्यातून मागील दोन-अडीच महिन्यापूर्वीच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे तो वाचला. त्या दरम्यान त्याने आपल्याला जगावेसे वाटत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. त्याने काही दिवसांपूर्वी दारूचे व्यसन सोडले होते. मात्र त्याच्या मनात काय आहे हे कळत नव्हते अशी माहिती नातेवाइकांनी दिली.
अनंतच्या घरी पाहुणे आलेले असल्याने त्याने पाहुणे आणि कुटुंबियांसोबत बुधवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत गप्पा मारल्या. नंतर तो झोपायला गेला. सकाळी पावणेआठ दरम्यान घराच्या बाजूलाच असलेल्या पत्र्याच्या बाथरूम मधील अँगलला त्याने गळफास घेतल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. नातेवाईकांच्या मदतीने त्याला पोलिस व्हॅनमध्ये घाटीत दाखल करण्यात आले असता, तर स्वतःच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अनंतला त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास तुकाराम राठोड हे करीत आहेत.