सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सतत टीका केली जात आहे. दरम्यान आजही भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारची मदत मिळत नाही. म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते, सरकार असलं तर जमिनीवर पाय ठेवून चालायच ही आमची भूमिका आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामास आज उपस्स्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, येत्या २ नोव्हेंबर रोजी बारामतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि देशातील महत्वाचे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

निवडणुकीवेळी मी म्हणालो होतो मतांचं ओझं टाका, मतदारांनी इतकं ओझं टाकलं की मी पार आडवाच व्हायची वेळ आलीय. मी १९९० पासून राजकारणात आहे, एवढी एकतर्फी निवडणुक पाहिलेली नाही. हे फक्त सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात होवू शकतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन प्रकल्पाची माळेगाव कारखान्याने उभारणी केली आहे. हि खूप कौतुकास्पद गोष्ट आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

Leave a Comment