रुग्णसंख्या वाढीमुळे राज्यात तूर्तास निर्बंधांमध्ये शिथिलता नाही – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात वाढत असलेल्या रुग्णवाढीबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. तसेच बाणेरमधील रुग्णालयाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी महत्वाची माहिती दिली. अनेक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ हि चिंताजनक आहे. त्यामुळे निर्बंध आहे तसेच ठेवले जाणार आहे. तूर्तास राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थितीहा आढावा घेतला. अधिकाऱ्यांशी झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. राज्यात रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात पहिले ठेवलेले निर्बंधजूनही कायम ताठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णसंख्या कमी झाली असती तर निर्बंधात शिथिलता दिली असती. मात्र, लोक अजूनही पर्यटनस्थळे तसेच इतर कारणांसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे तूर्तास आहे तेच तिसऱ्या टप्य्यात निर्बंध कायम ठेवले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, “सध्या कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाबरोबर तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. अशा परिस्थितीत निर्बंधांमध्ये शिथिलता देणे अश्यक्य आहे. शनिवार व रविवार या दोन दिवासात मोठ्या संख्येने लोक घराबाहेर फिरण्यासाठी पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा अधिकच प्रसार होत आहे. त्यांच्यावर अधिक कारवाई करणे देखील बरोबर वाटत नाही. त्यामुळे लोकांनीही स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये”.

जेजुरी येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी जो 349 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आहे. तर पहिल्या टप्प्यांतील विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही यावेळी पुपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Leave a Comment