हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: नाशिक येथील रुग्णालयात आज (21एप्रिल) दुर्दैवी घटना घडली. ऑक्सीजन टँकर लिंक झाल्याने तब्बल 22रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा अशी घटना घडू नये याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की ‘ नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बद्दल सहसंवेदना व्यक्त करतो’ असे म्हणत त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घ्यावी. राज्यातील अन्य सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 21, 2021
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले ‘या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल’ यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घ्यावी. राज्यातील अन्य सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरू राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत’.असे पवार म्हणाले.
तसेच नाशिक विभागाचे आयुक्त जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर आवश्यक उपचार तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.