सदस्यांनो सभागृहाची तरी प्रतिमा जपा, वर्तनामध्ये सुधारणा करा; अजितदादांनी टोचले कान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आजच्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांच्यात सदस्यांच्या गैर वर्तवणुकीवरून चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचे कान टोचले. “आपण या ठिकाणी कुत्री, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाहीत, याची जाणीव सदस्यांनी ठेवली पाहिजे. गेल्या काही वर्षात सभागृहातील सदस्यांच्या वर्तनामुळे आपल्या सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच धक्का पोहोचला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे,’ असे पवार यांनी म्हंटले.

यावेळी सभागृहात चर्चेवेळी वर्तवणुक, शिष्तीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन्ही बाजूच्या आमदारांकडून आदर्श वर्तन झाले पाहिजे. लोक प्रतिनिधींच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आता सभागृहातील कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण केले जाते. लाखो लोक मतदान करतात त्यावेळी आपण येथे येतो. आपण कुत्री, मांजरं, कोबंड्या यांचं आपण प्रतिनिधीत्व करत नाही याचे प्रत्येकाने भान राखले पाहिजे.

आमदार झालं म्हणजे सगळंच समजायला लागलं असं नाही; अजित पवारांनी चांगलंच झापलं..

अजित पवारांनी मत व्यक्त केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, 12 कोटी जनतेचे आपण प्रतिनिधीत्व करतो हे ध्यानात घ्यायाला हवे. ते जर ध्यानात घेतले तर आपल्याकडून व्यवस्थित वर्तन होईल.

विधानसभा हिवाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 12 महिन्यांकरिता आमदारांचे निलंबन करणे चुकीचे आहे, असे वाटल्याचे पाहून आम्हाला समाधान वाटत आहे. आपण आपले नियम पाळले तर न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, असे फडणवीस यांनी यावेळी म्हंटले.

Leave a Comment