निर्बंधात शिथिलता दिलीय म्हणून कायदा हातात घेऊ नका; अजित पवारांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात कोरोनाचे प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी निर्बंधात शिथिलता द्यावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात होती. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरीचिंचवड येथील निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याची माहिती देत पुणेकरांना इशाराही दिला. “पुण्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास सर्व शिथिलता मागे घेतली जाईल. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळावे कायदा हातात घेऊ नये,” असे पवार यांनी म्हंटले.

पुण्यातील निर्बंध राज्य सरकारकडून शिथिल केले जाणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, “पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार असून हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी देण्यात आली असून मॉल रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येणार. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाईल.”

पुण्यातील निर्बंधाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील धार्मिक स्थळे हि बंदच ठेवली जाणार असून याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या 13 तालुक्यांसाठी लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत. सोमवारपासून हे नियम लागू असतील. ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे 13 तालुक्यात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Leave a Comment