उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित झाला आहे. विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरुन महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. महेश मोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी गावातील तलाठी महेश मोटे यांच्याकडे गेले असता त्यांनी २० हजारांची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये संबंधित तलाठ्याला देत असतानाच्या प्रसंगाचा व्हीडीओ शेतकरी धायगुडे यांनी काढून घेतला. या व्हीडीओमध्ये तलाठी पैसे मोजताना दिसत आहेत. तसेच मला वरही पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे, मी करून घेतो, अशी चर्चा त्यात एकू येत आहे. हा व्हीडीअो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तलाठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, प्राप्त स्थितीचा विचार करून तहसिलदार विजय पाटील यांनी प्रथमदर्शनी मोटे कारवाईस पात्र असल्याचे स्पष्ट केले. काटेवाडी येथील तलाठ्याचा व्हायरल झालेल्या व्हीडीओची प्राथमिक तपासणी केल्यावर यामध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. नोंदीच्या बाबत जे कामकाज होणार होते, प्रथमदर्शनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक नियमाचा भंग केल्याचे दिसत आहे. त्यामुळे तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करत विभागीय चौकशीचा प्रस्ताव प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment