सातारा, सांगली जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कोयनानगर (ता. पाटण, जि. सातारा) येथील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे अन्य प्रश्न मार्गी लावण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून मार्गी लागेल. सांगली, सातारा जिल्ह्यांतील पात्र प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, तर व्हीसीद्वारे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे बघितलं जातं. या धरणासाठी प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्नही मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम कालबद्ध पद्धतीने 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात यावे. तसेच पात्र, प्रकल्पग्रस्तांना सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया महाराष्ट्र दिनापासून (दि. १ मे) सुरू करावी.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment